भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील हीर्डोस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी माध्यमिक विद्यालय व महूडे खोऱ्यातील माध्यमिक विद्यालय महूडे भूरट्या चोरांनी शुक्रवार दि-३० च्या रात्री फोडले.यात महुडे विद्यालयातील १५ कोरे दाखले व शाळेचा शिक्का चोरांनी लंपास केला तर हिर्डोशी विद्यालयाच्या एका खोलीचे कुलूप तोडले यात चोरट्यांना काही मिळाले नाही.
मागील एक महिन्यापूर्वी भुरट्या चोरांनी आंबवडे खोऱ्यातील चार गावांमधील बंद घरांची कुलपे तोडून चोऱ्या केल्या होत्या.यात सोन्याचे दागिने तर रोख रक्कम चोरीला गेली होती.या चोऱ्यांमधील चोर मोकाट असतानाच शुक्रवारी रात्री चोरट्यांनी बंद शाळेची कुलपे तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे.तालुक्यात होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.