सोमेश्वर रिपोर्टर टीम ------
मोरगाव : प्रतिनिधी
दि. १/७/२०२३ रोजी संस्थेने आयोजित केलेल्या महिंद्रा and महिंद्रा चाकण, पुणे, संजोत कॉर्पोरेशन पिंपरी चिंचवड, पुणे या कंपनीचे भरती मेळाव्या द्वारे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आला.
या मध्ये संस्थेतील ४० विध्यार्थ्याची प्रत्यक्ष निवड झाल्याने विध्यार्थ्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या संस्थेमध्ये प्रवेश घेतला की नोकरी हमखास मिळते याची विध्यार्थ्याना, संस्थेला जाणीव किंवा तळमळ दिसून आली. या संस्थेमध्ये फिटर, वेल्डर, वायरमन, इलेक्ट्रिशियन या ट्रेड मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाद्वारे व बऱ्याच मशिनरी द्वारे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे या संस्थेमध्ये मिळणारी हमखास नोकरीमुळे या वर्षी नवीन प्रवेशासाठी खूप गर्दी दिसून येत आहे. असे संस्थेचे प्राचार्य .उद्धव वाबळे सर यांनी सांगितले. तसेच कंपनी मध्ये ४० प्रशिक्षणार्थ्याची भरती मेळाव्या मध्ये निवड झाल्याने संस्थेचे सचिव.मनीषा खैरे व संस्थेचे अध्यक्ष.दिलीप खैरे यांनी सर्व शिक्षकांचे व विध्यार्थ्याचे अभिनंदन केले.