सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर येथील श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भगवान पवार महिला बालकल्याण अंतर्गत संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र बारामती यांच्याकडून गावात केलेल्या महिला सक्षमीकरणाबाबत ‘सुधारक पुरुष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गणपती उत्सव, शिवजयंती इतर महापुरुषांची जयंती, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या कर्तृत्वाची पावती म्हणून जितेंद्र भगवान पवार यांना महिला बालकल्याण अंतर्गत संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र बारामती यांच्याकडून गावात केलेल्या महिला सक्षमीकरणाबाबत ‘सुधारक पुरुष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रांमधून त्यांचे भरभरून कौतुक शुभेच्छांचा वर्षा होत आहे.