पुणे-बेंगलोर महामार्गावर कंटेनर व ट्रॅव्हल्स अपघातात एक ठार चार जखमी : शिरवळ जवळील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
शिरवळ : प्रतिनिधी
आशियाई महामार्गावर शिरवळ जवळील ट्यूब कंपनीजवळ ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून अन्य चार जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
             सदर अपघात आज पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास घडला असून पुढे असलेल्या कंटेनरला पाठीमागून जावून ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने झाला आहे. या अपघातात पुढे बसलेल्या एका प्रवाशाचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यु झाला असून ड्रायव्हरसह चारजण जखमी झाले आहेत.
To Top