शिरोळ : चंद्रकांत भाट
शिरोळला नगरपालिका स्थापन झाल्यानंतर शहरात कोटाविधी रुपयाचा निधी मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबर शहराच्या विकासासाठी आणला आहे शहरातील कचरा उठाव स्वच्छता मोहिमेस वेग यावा याकरिता शासनाच्या स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत शिरोळ पालिकेस ४४ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यातून लागणारी वाहने खरेदी करण्यात आली आहे यामुळे शहरातील स्वच्छता मोहीम गतीने करण्यास पालिकेस मदत होईल असा विश्वास लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केला
स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत शिरोळ पालिकेस मंजूर झालेल्या निधीतून ३ चाकी घंटागाडी २ तर ४ चाकी घंटागाडी २ लहान ट्रॅक्टर २ पुश कार्ड २५ बेलिंग मशीन १ अशी वाहने खरेदी करण्यात आली आहेत या वाहनांचे पूजन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. नगरसेवक प्रकाश गावडे राजेंद्र माने तातोबा पाटील जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे आण्णासो पुजारी पालिकेचे कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे स्वच्छता निरीक्षक अमन मोमीन साहिल मकानदार अर्जुन बल्लारी रायफल कांबळे निखिल कांबळे प्रकाश माने यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते