Big Breaking ! पंढरपूर दर्शनावरून परतताना भविकांवर काळाचा घाला ! जीप-क्रूझर अपघातात ६ ठार तर १० जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पंढरपूर : प्रतिनिधी
अक्‍कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ क्रूझर जीप आणि सिमेंट बल्गर गाडीचा अपघात झाला असून या अपघातात क्रूझरमधील सहाजण जागीच ठार झाले असून ७ ते १० जण जखमी झाले आहेत.
        सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या वाजताचसुमारास झाला. मृत व जखमींना अक्‍कलकोट येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. क्रूझर जीपमधील सर्वजण हे पंढरपूर येथे आषाढी वारीचा सोहळा संपवून शुक्रवारी दुपारी गावाकडे निघाले होते अशी सूत्रांची माहिती आहे. मयतांमध्ये पाच महिला व एका मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे.
           एमएच १२ यूएम ७१८६ क्रमांकाचा सिमेंटचा बल्गर गुलबर्गा येथून वागदरीमार्गे अक्‍कलकोटकडे येत होता. तर क्रूझर जीप नं. केए  ए ७४९५ ही अक्‍कलकोटकडून गुलबर्गाकडे जात होती. क्रूझरमधील सर्वजण हे देवदर्शन करून कर्नाटकातील अणूर या गावाकडे जात असताना शिरवळवाडी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझर जीपमधील प्रवासी हे सहाजण मयत तर अन्य जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह शिरवळवाडी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. या अपघातातील मयत व जखमींना उपचारासाठी तात्काळ अक्‍कलकोट येथील प्राथमिक उपचार केंद्राकडे हलविले आहे. अपघातातील मयत व जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.
To Top