सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
धावपळीच्या युगात सर्वांचेच आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजाराला वय राहिले नसून कोणत्याही वयात कोणालाही आजार उदभवु शकतात यासाठी प्रत्येकाने आरोग्याची तपासणी करत आपले आरोग्य जपावे असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर कारखाना व तथास्तु हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शैलेश रासकर, सुनील भगत, शिवाजीराजे निंबाळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, हरिभाऊ भोंडवे, बाळासाहेब कामठे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह कामगार व अधिकारी उपस्थित होते. शिबीरात जवळपास ४०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जगताप पुढे म्हणाले, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत अनेक सामाजिक प्रश्न मांडले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सर्वच जातीच्या नागरीकांच्या आरक्षणाबाबत त्यांनी ठोस भूमिका घेत लोकसभेत आवाज उठवला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने दरवर्षी कामगारांची आरोग्य तपासणी केली जात असून त्यांना विमा संरक्षण ही दिले असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. शिबीरात हृदयासंदर्भात विकार, ईसीजी, रक्तदाब, शुगर, वजन, सांधेदुखी, श्वसनविकार, दमा, किडनीचे आजार आदी तपासणी करत मोफत औषधोपचार करण्यात आले. शिबीरासाठी हृदयरोग तज्ञ डॉ. सतिश चव्हाण, जनरल सर्जन डॉ. अविनाश चव्हाण, डॉ. महेश कोपले, कारखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कदम यांनी सहकार्य केले.
COMMENTS