बारामती : सावित्री हॉस्पिटल लोणंद व सानवी हॉस्पिटल सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शासनाच्या अनेक योजना सामान्य लोकांसाठी असतात त्यातलीच एक महात्मा ज्योतिबा फुले ही योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूने खासदार सुप्रिया सुळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वरनगर परिसरातील सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. 
            यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषि गायकवाड, बाळासाहेब शिंदे, डॉ.अमोल जगताप, डॉ.शिवदे, निलेश गायकवाड, हरिष गायकवाड,सुहास गायकवाड,बंटी गायकवाड, विनोद गायकवाड उपस्थित होते. आपल्या भागातील सामान्य लोकांची आरोग्य संपन्नता राहावी या हेतूने आयोजित केलेल्या या हृदय, शुगर, डोळे, हाडे तपासणी उपक्रमाला परिसरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. याच ठिकाणी निदान झाल्यानंतर सांधेदुखी, गुडघे दुःखी इत्यादी व्याधींवरती गोळ्या औषधांचे मोफत वाटपसुद्धा करण्यात आले.
यातून हृदयविकार, डोळ्यांचे विकार आधी व्याधींनी त्रस्त असणाऱ्या लोकांवराती शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत पुढील उपचार केले जाणार आहेत.
या उपक्रमास उपस्थित असणाऱ्या महिला डॉक्टर, सिस्टर व वृद्ध महिला यांच्या हस्ते केक कापून खा. सुळे  वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला व आरोग्य संपन्नतेचा संदेश देण्यात आला. महिला डॉक्टर,सिस्टर,वृध्द महिला यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसानिमित्त नागरिकांन मधे आरोग्याचा संदेश देण्यासाठीच आरोग्य शिबिराचे आयोजन करून  वाढदिवस साजरा करण्यात आला.
To Top