भोर ! संतोष म्हस्के ! सोमेश्वर रिपोर्टर बातमीचा दणका..! अवघ्या काही वेळातच बांधकाम विभागाने राणी लक्ष्मीबाई फुलावरील पाणी काढले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणेहुन भोर शहरात येणारा तसेच भोर शहरातून पुणेकडे जाणारा महत्त्वाचा वाहतुकीचा नीरा नदीवरील मार्ग राणी लक्ष्मीबाई फुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरशः पाण्याची तळी साचल्याने प्रवासी वाहनचालक त्रस्त झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते.मात्र सोमेश्वर रिपोर्टरने प्रसिद्ध केलेल्या भोरच्या राणी लक्ष्मीबाई पूलावर रस्तावहे की पाण्याची तळे या बातमीचा इम्पॅक्ट होऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील खड्ड्यांमधील पाणी काढून रस्ता साफ करण्यात आला.
     भोर नगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करताना भोलावडे गावापासून सुरू झालेल्या राणी लक्ष्मीबाई पुलावर मोठ- मोठे  खड्डे पडून पुलाची दुरावस्था झाली होती.परिणामी पुलावरून पाणी साठत असल्याने वाहतूक करताना प्रवाशी,वाहन चालकांना मोठ्या अडचनिंना सामोरे जावे लागत होते.तर राजा रघुनाथराव विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना या पुलावरील खड्ड्यात साठलेले पाणी अंगावर उडत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष घालून तात्काळ खड्ड्यांमधील पाणी बाजूला करून रस्ता साफ केला तर पुढील दोन दिवसात पुलावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सांगितले.
To Top