वाई ! खबऱ्याची गुप्त माहिती आणि वाई पोलीस ॲक्शन मोडवर.. शहरातील गंगापूर येथे एक गाडीतून अवैद्य विमल गुटख्यासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
सातारा शहरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली  सहा पोलीस निरीक्षक .आशिष कांबळे व सुधीर वाळुंज यांना सूचना दिलेल्या होत्या.                         त्याप्रमाणे यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. आशिष कांबळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या दिनांक 23/07/2023 रोजी वाई पोलीस ठाणेचे परि सहा पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांना त्यांच बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,गगापुरी  वाई  येथे एका  कार  मध्ये   बेकायदा बिगर परवाना विमल गुटख्याचा साठ्ठा केलेला आहे.अशी माहिती मिळाल्याने  सपोनी श्री आशिष कांबळे,पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस अंमलदार विजय शिर्के ,श्रावन राठोड,प्रेम शिर्के ,प्रसाद दुदुस्कर  यांनी गंगापुरी मध्ये जाणारे रोडवर सतर्क पेट्रोलिंग करून सापळा रचला. त्यानंतर दुपारचे सुमारास मिळाले बातमीप्रमाणे एक संट्रो कारची झडती घेतली असता  दहा ते पंधरा  पांढ-या रंगाच्या पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु असल्याने पोलीसांनी  इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता वाहनचालक केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु बिगरपरवाना वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडुन केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण  6,37,000 /-₹ माल जप्त करणेत आला असून नमुद इसमावर वाई पोलीसांनी गुटखाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून  कारवाई केली आहे.सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा,  बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक , सातारा.  बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी  वाई विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली परि सहा  पोलीस अधीक्षक कमलेश मीना , स.पो.नि. आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पो. हेड कॉ. विजय शिर्के,श्रावण राठोड,प्रेम शिर्के,प्रसाद दुदुस्कर. यांनी केली आहे.
To Top