बारामती ! निंबुत येथे गळफास घेत एकाची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
निंबुत (कोळी वस्ती) ता. बारामती येथे एका परप्रांतीय कामगारानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
          प्रल्हाद कहर वय २३ मूळ रा मध्यप्रदेश कामगाराने पोल्ट्री वरील राहत्या घरात छताला साडी बांधून दुपारी १२ वाजता आत्महत्या केली आहे.  नवरा बायकोच्या किरकोळ वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. चार महिन्यापूर्वीच प्रल्हाद चे लग्न झाले होते व दोन महिन्यापूर्वी नीरा मोरगाव रोड येथील कोळी वस्ती नजीक पोल्ट्री फार्म वरती कामाला आले होते. पुढील तपास वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोउनि‌ योगेश शेलार करीत आहेत. 
To Top