सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
कपाशी ता फलटण येथील शरयू साखर कारखान्याची एक कोटी चौदा लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर लोणंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये कारखान्यातील तीन इंजिनिअरचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,
कापशी ता. फलटण येथील शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लि .कापशी या कारखान्यात 2021 पासून आज पर्यंत फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा रा. अहमदनगर व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा रा . सांगली यांनी महाराष्ट्र शासनाने व वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के असलेली कागदपत्रे सादर करून कंपनीमधील सीनियर इंजिनियर
संतोष होले रा. जाधववाडी ,चीप इंजिनियर महादेव भंडारे रा. कराड, सिनिअर इंजिनिअर संजय मुळे रा. उंबरे ता. पंढरपूर यांना हाताशी धरून त्यांच्याशी संगणमत करून त्यांना पैशाचे अमिश दाखवून नवीन काम न करता पूर्वीच असणाऱ्या मशिनरी व साहित्य पॅनल बॉक्स पाईप हे सर्व नवीन टाकले आहेत . तसेच नवीन काम केले असेच भासवुन त्यांनी कंपनीत खोटी बिले तयार करून ती सादर करून कंपनीकडून रक्कम घेऊन एकूण 1 कोटी 14 लाख 90 हजार 358 रुपयांची आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला.
म्हणून पाच जणांच्या विरोधात अविनाश भापकर रा. आसू यांनी लोणंद पोलिसात फिर्याद दिली . त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पीएसआय विशाल कदम करीत आहेत.