सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -महाड मार्गावर वरंधा घाटातील वारवंड- शिरगाव ता.भोर येथील कार दुर्घटनेत तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता तर एक जण बचावला होता.या दुर्घटनेतील दोन मृतदेह शनिवार दि.२९ तात्काळ मिळून आले होते तर स्वप्निल शिंदे रा. हडपसर बेपत्ता होता.सोमवार दि.३१ स्वप्निल याचा मृतदेह पाण्यावर तरंगलेला मिळून आला असून हा मृतदेह भोर पोलीस तसेच भोईराज जल आपत्ती पथकाच्या मदतीने बाहेर काढन्यात आला.
यावेळी पोलीस हवालदार यशवंत शिंदे,सुशांत पिसाळ,विशाल मोरे,सर्कल पांडुरंग लहारे,तलाठी सितराम काराळे ,कोतवाल विजय डेरे,पोलीस पाटील भाऊसो उंब्राटकर, ग्रामस्थ दत्ता पोळ ,भागूची पोळ, आदींसह नागरिक उपस्थित होते.