पुरंदर ! सासवडच्या भाऊ-बहिणीचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश : तालुक्याच्या शहरी विभागातून मिळवला पहिला व दुसरा क्रमांक

Admin
 सोमेश्वर रिर्पोटर------ 
प्रतिनिधी : विजय लकड़े
म.ए.सो.वाघीरे विद्यालय , सासवड या विद्यालयातील सार्थक सोमनाथ गजरे याने इयत्ता ८ वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २५२ गुण मिळवून शहरी विभागात
पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच सिध्दी सोमनाथ गजरे हिने इयत्ता ५ वी.च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २५८ गुण मिळवून शहरी विभागात पुरंदर तालुक्यात द्वितीय  क्रमांक  मिळवला.                                          एकाच कुटुंबातील दोन्ही मुले शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाल्यामुळे व जिल्हा गुणवत्ता यादीत  स्थान मिळविल्यामुळे परिसरातून कौतुक करण्यात आले.  या यशासाठी नरवणे, तळे , सोमनाथ गजरे सर व वैशाली गजरे यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षक सोमनाथ गजरे व टेकवडी शिक्षिका वैशाली गजरे यांच्या दोन्ही मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार महादेव माळवदकर, जिल्हा सरचिटणीस संदिप जगताप, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, शिक्षक नेते लतीफ इनामदार, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर, सरचिटणीस भाऊसो बरकडे, कार्याध्यक्ष सुनील जगताप, कोषाध्यक्ष संतोष इनामके, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मधुबाला कोल्हे, जिल्हा प्रतिनिधी सुजाता कुंभार, पुरंदरच्या अध्यक्षा अश्विनी शिंदे, सरचिटणीस निर्मला घाटे, कार्याध्यक्ष नीलम दगडे, कोषाध्यक्ष निर्मला पोमण, उपाध्यक्ष हिरकणी कुंभार सल्लागार जयश्री उबाळे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक गणेश कामठे, सुनील कांबळे, मनोजकुमार सटाले, सुरेश जगताप, गणेश लोणकर, मधुबाला कोल्हे, पंढरीनाथ काळे, दिनेश दुधाळ ,संजयआबा जाधव, संदिप कुंभार, विजय शिंदे, शांगृधर कुंभार, गणेश म्हेत्रे, गोविंद लाखे  संजय जमदाडे, सलीम शेख, कुंडलिक कुंभार निजाम मुलाणी, मेघराज कुंभार यांनी अभिनंदन केले.
To Top