बारामती ! सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांचेकडून इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांना ५० हजारांचा धनादेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वाढदिवस साधेपणाने करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांना मदत करण्याचे केलेल्या आवाहनाला नागरीकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.        
 
              बारामती तालुक्यातून भरघोस मदत होत आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते अभिजित काकडे यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांना ५० हजार रुपये आर्थिक मदत केली. मदतीचा धनादेश माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बापूराव गडदरे, धनंजय गडदरे, अतुल लकडे, विराज मदने उपस्थित होते. 
To Top