बारामती ! सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रमोद जगताप यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रमोद जगताप यांची निवड करण्यात आली आहे. 
          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षक प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालयाची दुरा आता जगताप यांच्या खांद्यावर आली आहे. उपप्राचार्य म्हणून मारुती गडदरे आणि  पर्यवेक्षिका म्हणून व्ही.आर. शिर्के यांची निवड करण्यात आली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या अगोदरचे प्राचार्य बाळासाहेब मिंड यांची मुढाळे येथे प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. मुरूम येथील रहिवाशी असलेले प्रमोद जगताप हे १९९२ पासून याच विद्यालयात अध्यापनाचे काम करत आहेत. सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्राशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, सचिव भारत खोमणे यांनी जगताप यांचे अभिनंदन केले. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी व गुणवत्ता यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जगताप यांनी निवडीनंतर सांगितले. 

To Top