बारामती ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत..ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या पुढाकारातून इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी सोमेश्वरकरांनी जमा केले २ लाख

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
  १९ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील मनिवली (ता. खालापूर) येथील इर्शाळवाडीमधे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती व त्यामुळे अनेक आदिवासी नागरिकांचे मृत्यू झाल्याची व त्यांच्या कुटुंबावर संकट आल्याची परिस्थिती होती. 
         आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा त्यांचा २२ जुलै रोजी असणारा ६४ वा वाढदिवस साजरा न करण्याचे व हार फुलांवरती खर्च न करता ते पैसे इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्तांना मदत म्हणून देण्याचे आवाहन केले होते.
           अजित पवार यांनी केलेल्या या आवाहनास प्रतिसाद म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमधील मित्र परिवाराला सोबत घेत लोकसहभागातून तब्बल २ लाख रुपये इतका निधी जमा केला होता. जमा झालेल्या या निधीचा धनादेश  ऋषिकेश गायकवाड यांच्या हस्ते आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे अभिनंदन व्यक्त केले. यावेळी सागर गायकवाड, नितीन साखरे, सूरज जाधव व संग्राम हुमे, आवाळवाडीचे सरपंच अमोल आव्हाळे उपस्थित होते.
To Top