बारामती ! सोमेश्वर विद्यालय आंबी बुl मुख्याध्यापकपदी संजय होळकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी येथील सोमेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी संजय पर्वतराव होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या झालेल्या सभेत होळकर यांना पदोन्नती देण्याबाबत निर्णय झाला. संजय होळकर हे सन १९९१ पासून सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अंजनगाव, नींबूत तेथील भागशाळा सोमेश्वरनगर, मुढाळे या ठिकाणी काम केले आहे. एक उत्तम खेळाडू व क्रीडा शिक्षक म्हणून बारामती तालुक्यात त्यांचा लौकिक आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शालेय खेळाडूंना घडवले असून नॅशनल पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना नेले आहे. अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धात त्यांनी पंच म्हणून निर्णायक कामगिरी केली आहे. सध्या ते बारामती तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असून अनेक स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबवणार असल्याची भावना संजय होळकर यांनी व्यक्त केली.
  मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याने सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,  प्रणिता खोमणे, संचालक मंडळ, संस्थेचे सचिव भारत खोमणे तसेच बारामती तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे व पदाधिकाऱ्यांनी होळकर यांची कौतुक केले आहे.
To Top