कोरेगाव ! उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिव आरोग्य सेनेच्या वतीने कर्करोग निदान शिबिर संपन्न : ३०० पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्ष व माजी महापौर मुंबई शुभा राऊळ, कार्याध्यक्ष  किशोर ठाणेकर तसेच शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र  सकपाळ यांच्या मार्गदर्शनानुसार  सोळशी ता. कोरेगाव येथील शनेश्वर देवस्थान येथे मोफत कर्करोग निदान उपचार शिबिर व अधिक श्रावण व निज श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्हा, श्री .शनेश्वर देवस्थान सोळशी तसेच ऑन्को लाईफ हॉस्पिटल शेंद्रे या सर्वांच्या सहकार्यातून करण्यात आले.
या शिबिराचा लाभ कोरेगाव तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील शनेश्वर देवस्थान येथे आलेले भक्तगण महिला पुरुष नागरिकांनी घेतला 
श्री. नंदगिरी महाराज, शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समनव्यक निमिश शहा , शनेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष हनुमंतराव वाघ कोरेगाव तालुका  शिव आरोग्य सेना  समनव्यक वसंत धुमाळ ,नायगवचे सरपंच  नितीन धुमाळ  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व  फीत कापून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिराचा लाभ३०० हुन अधिक  पुरुष व महिला भक्तगणांनी घेतला.
या शिबिरास  शिव आरोग्य सेनेचे मान खटाव फलटण सचिव  शैलेंद्र नलवडे, शिवसेनेचे फलटण तालुकाप्रमुख  विकास नाळे, फलटण शहर समन्वयक  अंकुश पवार, उप शहर समन्वयक प्रवीण पवार, हनुमंत  चवरे, तसेच कोरेगाव उत्तर तालुकाप्रमुख  श्रीकांत निकम, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव, शाखाप्रमुख संभाजी (राजे) धुमाळ, शिवसेना उपशहर प्रमुख सातारा आणि शिवा आरोग्य सेना सातारा शहर समन्वयक  मारुती वाघमारे, शिवसेना कराड उत्तर कोअर कमिटी  रमेश चव्हाण सर, मोहित शहा युवासेना इत्यादी शिवा आरोग्य सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजेरी लावून शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
   ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल शेंद्रे सातारा यांचे डॉक्टर प्रसाद कवारे, डॉ मनीषा मगर,   उमंग पवार,  रूपाली साळुंखे, नितीन जगदाळे या सर्वांनी रुग्णांची तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
To Top