सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
साखरवाडी : गणेश पवार
फलटण शहरात राहत असलेल्या पितापुत्राचा आकस्मित मृत्यू झाला आहे. दोघांनी जेवण केल्यानंतर आयुर्वेदिक काढा घेतला होता. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत्यूचे कारण शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
हनुमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55, रा. गजानन चौक, फलटण) आणि त्यांचा मुलगा अमित पोतेकर (वय 32) असे आकस्मित मृत्यू झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हनुमंतराव रामभाऊ पोतेकर ( वय 55 ) आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत रात्री जेवण केले. जेवण झाल्यानंतर दोघांनी व मुलगी हिने आयुर्वेदिक काढा पिला. काढा पिल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला.
त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान हनुमंतराव पोतेकर व त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनी अमित पोतेकर यांचा मृत्यू झाला. दोघांसोबत त्यांच्या मुलीवरही उपचार करण्यात आले. यावेळी मुलीला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या मुलीची तब्येत सुधारली असून पिता-पुत्राचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. दोघांचा मृत्यू हा विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे कारणामुळे झाला हे पितापुत्रांच्या शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या पिता पूत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS