सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अलिकडच्या काळात पत्रकारांवर होणारे हल्ले वाढले आहेत. समाजातुन या हल्ल्याचा निषेध होतो पण त्याचा पठपुरावा कमी पडतो अशा वेळी पत्रकाराना अनेकदा माघार घ्यावी लागते. यावर कायम उपाय बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने निवडला आहे त्यानी वकिलाचीच नेमणुक हल्ला कृती समितीवर केली आहे .
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची आज तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थित वार्षीक बैठक पार पडली. यामधे नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारीणीची निवड करण्याचे अधिकार सर्व पत्रकारानी जेष्ठ सदस्य जयराम सुपेकर ,अशोक वेदपाठक ,गणेश आळंदीकर ,दत्ता माळशिकारे व चिंतामणी क्षीरसागर याना दिले व सर्वानुमते पदाधिकारी यांची निवड झाली .
दरम्यान लोकमतचे पत्रकार महेश जगताप यांनी आपल्याला पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती नेमली पाहीजे असे मत मांडले यावेळी पत्रकार कल्याण पाचांगणे यानी कायद्याचा अभ्यास असणा-या व्यक्तीची निवड अध्यक्ष म्हणुन व्हावी असे मत मांडले त्यावर या समितीत संघाचे पदाधिकारी काम करतील व कृती समिती अध्यक्षपदी ॲड गणेश आळंदीकर यांची निवड करा असा ठराव सर्व पत्रकारानी केला. ॲड आळंदीकर यानी पत्रकारीतेत सुमारे २५ वर्ष काम केल्याने त्यांचा अनुभव तसेच वकिली क्षेत्रात ही त्यांचे कार्य मोठे असल्याने त्यानाच अध्यक्ष करण्याची मागणी सर्व पत्रकारानी केली .त्यावर एकमताने त्यांची निवड करणेत आली .