पुरंदर ! विजय लकडे ! आई-वडिलांवर भार नको म्हणून १४ वर्षाच्या प्रवीणने थेट नीरा गाठली : प्रहार संघटनेचे मंगेश ढमाळ यांनी उचलली प्रवीणच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : विजय लकडे 
मुंबई-कल्याण येथील एक १४ वर्षांचा मुलगा आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांवर शिक्षणाचा भार नको म्हणून शाळेतून परस्पर दाखला काढून त्याने थेट पुरंदर तालुक्यातील नीरा गाठली. आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे त्याची आईवडिलांची भेट देखील झाली तर त्याला पाडेगाव (फलटण) येथील आश्रमशाळेत दाखल करून त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली आहे. परिसरातून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.
     प्रवीण मारुती शिंदे वय १४ रा. कल्याण- मुंबई हा विद्यार्थी नीरा रेल्वे स्टेशनवर मानसिक दाबाखाली रेल्वेची वाट पाहत असताना प्रहार चे कार्यकर्ते अनिकेत मदने यांच्याकडून फोन करण्यासाठी मोबाईल मागून घेतला  घरी आई-वडिलांशी फोनवरून बोलत असता त्याच्या डोळ्यातून पाणी आले होते.  
प्रहारचे कार्यकर्ते अनिकेत मदने यांच्या लक्षात ही बाब आली असता
 त्यांनी या विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली या विद्यार्थ्याचे आई-वडील मुंबईमध्ये हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात.   
प्रवीण इयत्ता नववीच्या वर्गात चांगल्या  मार्कांनी उत्तीर्ण होऊन इयत्ता दहावी मध्ये  गेला होता 
परंतु पैसा अभावी पुढील शिक्षण घेणे त्याच्या आवाक्या बाहेरची होते.  आई-वडिलांना न सांगता त्यांनी शाळेतून दाखला काढून आणला होता.    
       अनिकेत मदने यांनी प्रहार चे पुरंदर तालुका अध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्याशी संपर्क साधून व त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला.आई वडिलांना मुंबई येथून निरा येथे बोलवले त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रवीण च्या पुढील शिक्षणाची सोय समता आश्रम शाळा पाडेगाव येथे करून दिली. प्रवीणच्या इथून पुढील शिक्षणाचा सर्व खर्च पुरंदर तालुका प्रहार चे अध्यक्ष मंगेश डमाळ यांनी उचलला आहे.
To Top