भोर ! तीस तास उलटूनही नीरा-देवघर धरणात बुडालेल्या स्वप्नील शिंदे या तरुणाचा मृतदेह बेपत्ताच

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुण्याहून वरंधा घाटात चारचाकी वाहनाने फिरण्यासाठी आलेल्या अपघातग्रस्त एका तरुणाचा ३० तास होऊनही मृतदेह बेपत्ताच असून अतिवृष्टी सुरू असतानाही शोध कार्य सुरू आहे.
      पुणे येथील ३ तरुण व १ तरुणी भोर तालुक्यातील भोर-महाड मार्गावरील वरंधा ता.भोर घाटात शनिवार दि.२९ वर्षाविहार करण्यासाठी आले होते. घाट रस्त्यावरून जात असताना शिरगाव नजीक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चार चाकी बलनो गाडी नीरा - देवघर धरणाच्या पात्रात ३०० फूट खोल कोसळली होती.यात एक जण बचावला ,दोघांचा जागीच मृत्यू झाला तर १ तरुण बेपत्ता होता.३० तास उलटून गेले तरी धरणपात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बेपत्ताच असून भोईराज जल आपत्ती पथक तसेच भोर पोलीस शोध घेत आहेत.
To Top