सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी (धनंजय गोरे )
गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे केळघर विभागातील भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडी या गावांनाअतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. दरडी,कडे कोसळले होते. नदीपात्रात असलेल्या शेतजमिनीत मोठ्यामोठ्या दगडी आल्या होत्या. नद्या,ओढ्यांनी प्रवाह बदलल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. शेती वाहून गेल्याने या तीनही गावांतील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्ननिर्माण झाल्याने या तीनही गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या गावांतील ग्रामस्थांनी केली होती.
सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यासह राज्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत असून या बाबींचा विचार करता जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन संपर्क प्रमुख उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतिश धुमाळ,उपविभागीय अधिकारी जावली दादासाहेब दराडे,तहसिलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी दरड प्रवण गावे भुतेघर,वाहिटे, बोंडारवाडी या गावांची पाहणी केली.गेल्या दोन वर्षा पूर्वी जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागातील या तीन गावांत डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणावरअतिवृष्टी झाली होती.याची संपूर्ण माहिती सरपंच व गावातील लोकांकडून घेऊन दरड प्रवन क्षेत्र प्रत्यक्ष पाहणी करून येथील नागरिकांना सतर्क राहणे बाबत सूचना दिल्या नागरिकांना तात्पुरत्या स्थलांतरण साठी काही ठिकाणे प्रत्यक्ष पाहणी करून स्थलांतर करण्याबाबची माहिती घेऊन संभाव्य धोक्याची ठिकाणी असलेल्या कुटुंबांना अतिवृष्टी कालावधीत स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या.
या वेळी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे,तलाठी संदीप ढाकणे,तलाठी सुरज माळी,ग्रामसेवक रविकांत सपकाळ ग्रामसेवक सुधीर पोतदार भुतेघरचे सरपंच अंकुश मानकुबंरे, बोंडारवाडी सरपंच सुनिता मानकुंबरे,विष्णू मानकुबंरे,वाहिटेचे राजाराम जांभळे, बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे,गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.