सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बिभवी मधील राज मोहन गुळंबे याने २४४ गुण आणि अर्णव ज्ञानेश्वर चव्हाण याने २४२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यासोबतच बिभवी शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलेले ९ पैकी ९ विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेचा यावर्षीचा निकाल १००% लागला आहे.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ.दिपाली सुधाकर दुंदळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर वेंदे,अर्चना गोळे,अमिता एरंडे,सुनीता कामटे यांचे विशेष सहकार्य लाभले.या यशाबद्दल शिक्षण विभाग, पंचायत समिती जावळी, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ मंडळ बिभवी आणि रिटकवली यांचे वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राज गुळंबे,अर्णव चव्हाण आणि मार्गदर्शिका सौ.दिपाली सुधाकर दुंदळे यांचा शिक्षण विस्तार आधिकारी कल्पना तोडरमल,चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख संपत धनावडे यांनी शाल,श्रीफळ, शैक्षणिक साहित्य,गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन गौरव केला.
शाळेच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, केंद्रप्रमुख संपत धनावडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे आणि सदस्य, ग्रामस्थ मंडळ,बिभवी आणि रिटकवली,विद्यार्थी व शिक्षक यांनी अभिनंदन केले