सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
शहाजी हायस्कुल माध्यमिक विद्यालय सुपे या ठिकाणी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळेतील मुलींना काही रोडरोमिओंकडून त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले होते. मात्र ग्रामस्थांच्या तक्रार केल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांकडून सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
याबाबत सुपे ग्रामस्थांनी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
यामध्ये म्हणाले होते की, श्री शहाजी हायस्कुल माध्यमिक विद्यालय, सुपे येथील सिनियर कॉलेज सकाळी ८ ते १२ पर्यंत असते. या शाळेत शाळाबाह्य मुलांचा वावर होत असतो. त्याचा मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या शाळेतील परिसरामध्ये विनाकारण मुलांचा वावर होत असल्याकारणाने श्री शहाजी हायस्कुल या ठिकाणी शाळेच्या वेळेमध्ये पोलिस बंदोबस्त मिळावा व शाळाबाह्य मुलांवर कडक कारवाई करण्यात यावी. यावरून आनंद भोईटे यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत मुली सुटण्याच्या वेळेत मुलींच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस बंदोबस्तासाठी ठेवले आहेत.
याबाबत सुपे ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शेंडगे, किसन ताडगे, सचिन दरेकर यांचे आभार मानले आहेत.