पुरंदर ! शासन आपल्या दारीसाठी...तारीख पे तारीख !२३ ला होणारा जेजुरीतील कार्यक्रम चौथ्यांदा पुढे ढकलला..! मांडवाचे भाडे, तयारीचा खर्च वाया गेला, लाभार्थ्यांना पुन्हा प्रतिक्षा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
पुरंदर : प्रतिनिधी
जेजुरी येथे २३ जुलै रोजी होणारा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे ही सांगितले गेले आहे. हवामान विभागाकडून राज्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे समजते. 

      महाराष्ट्र शासनाकडून राज्यभरात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत केला जात आहे. कोट्यावदींचा खर्च या आलिशान कार्यक्रमासाठी केला जात आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे मागील महिन्यात ३, ८, १३ व आता २३ जुलैला कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन केले होते. एक लाख चौरस फुटांचा भव्य मंडप तोही वाटरप्रुफ, भव्य स्टेज बांधून तयार आहे. गेली दहा दिवस या मंडपाचे भाडे सुरु असल्याचे समजते. मागील १३ तारखेला तर स्टेजवर एल.ईडी स्क्रिन, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, एक लाख खुर्च्या कार्यक्रमस्थळी पोहचल्या ही होत्या. दोन हॉलिक्याप्टर उतरतील असे हॅलईपॅड ही तयार करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना एसटी बसची सोय ही करण्यात आली होती. इलेक्ट्रिकल सामग्रीची चाचणी ही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. या सर्व तयारीसाठी किमान एक कोटींचा खर्च आल्याची चर्चा होती. आता पुन्हा तयारी जोर धरत असतानाच जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेने कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की पुणे जिल्हा प्रशासनावर आली आहे. 

    शासनाकडून शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया गेली दोन महिन्यांपासून सुरू होती. या कार्यक्रमा निमित्ताने लाभार्थ्यांना कागदपत्रे, शासनाच्या अनुदानाच्या वस्तू, विद्यार्थ्यांचे विविध दाखले तसेच रोजगार मेळाव्यचे आयोजन केले होते. या सर्व लाभार्थ्यांना आता परत नव्या तारखेकडे डोळे लावून बसावे लागले असून, पुन्हा प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. या पुर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील नेत्यांच्या वेळेनुसार कार्यक्रम लांबत होता. पण आता निसर्गाला ही हा कार्यक्रम  होऊ द्यायचा नसल्याने गोरगरीब लाभार्थ्यांच्या हिरमोड होतो आहे. 

   'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी कोट्यावधींची खर्च केला जातो. हा खर्च जनतेच्या पैशानीच होत असतो. पुरंदर मध्ये सलग तीन वेळा हा कार्यक्रम रद्द झाल्याने खर्च वाया गेल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती. हि सर्व तयारी करताना आगाऊ रक्कमा दिल्याशिवाय कोणतीच यंत्रणा कम करत नसते. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी गावोगावी मोठ्याप्रमाणावर जाहिरातीचे फ्लेक्स लावले गेले होते. हा सर्व खर्च आत पाण्यात गेल्याणे सर्वसामान्यां प्रचंड नाराजी आहे. आता नव्याने कार्यक्रमाची तारीख देण्यापेक्षा लाभार्थ्यांना लागणारे दाखले, शासन अनुदानाच्या वस्तू विद्यार्थ्यांचे विविध दाखले तात्काळ घरपोच करावेत, अशी तीव्र भावना लोक व्यक्त करत आहेत.
To Top