सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधून भविष्यातील अब्दुल कलाम घडावेत, विद्यार्थ्यांना उद्योग, व्यवसायाची गोडी लागावी यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करत आहोत. विद्यार्थीना स्वतःच्या मनातली संकल्पना मांडण्यासाठी अशा विज्ञात प्रकल्पांची गरज असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय 'सोमेश्वर टेक्नोथॉन 2k23' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटन प्रसंगी जगताप बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, संचालक राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, सुनील भगत, शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, ऋषी गायकवाड, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, प्रवीण कांबळे, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे प्रा. डॉ. संजय देवकर सचिव भारत खोमणे, गट शिक्षण अधिकारी संपत गावडे, गटविकास अनिल बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी राज्यभरातील शाळांमधील जवळ साडेचारशे विज्ञान प्रकल्पांनी सहभाग घेतला होता.
बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल म्हणाले, देशाचा चांगला नागरिक घडविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल रुची निर्माण करणे आवश्यक आहे. नव्या काळात विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षक, पालकांनी त्यांच्यातील प्रयोगशीलता विकसित करावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस के हजारे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. संजय देवकर यांनी मानले.
COMMENTS