पुरंदर बिग ब्रेकिंग ! नीरा नजीक पिंपरे येथे एकाचा गळा चिरुन खुन : नीरा डाव्या कालव्याच्या भराव्यावर प्राणघातक हल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील नीरा नाजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये मृत्यू  झाला आहे. 
         कोयात्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. जेजुरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. हरिश्चंद्र बजरंग थोपटे (वय ४२) रा. बेंदवस्ती पिंपरे (खुर्द) हे ज्युबिलंट कंपनीत ते माथाडी कामगार होते. कमावरुन घरी जाताना त्यांच्यावर वार करण्यात आले. साडेसात वाजता पुणे पंढरपूर महा मार्गालगत नीरा डाव्या कालव्यारील डाव्या बाजूच्या भरव्यावरून दुचाकी हिरोहोंडा सी.डी १०० क्रमांक एम.एच. १२- बी.आर. ७२१९ वरुन जात असताना अचानक अज्ञात व्यक्तीने वार केल्याची चर्चा आहे. थोपटे यांचा गळा चिलेल्या अवस्थेत म्रुतदेह लोकांन आढळला. तिक्ष हत्याराने अज्ञात व्यक्तीने वार केल्याचे दिसून येत आहे. तीन वार इतका जोरात आहे की सराईत गुन्हेगाराने वार केल्याचे जाणवते असल्याची चर्चा स्थळी आहे. कपाळावर, नाकावर व हणवटी ते मान या भागात खोलवर जखमा असल्याने ते जागीच म्रुत पावले.
To Top