जावली पंचायत समितीला मिळाले नवीन गटविकास अधिकारी : मनोज भोसले यांची नियुक्ती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे )
जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी मनोज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
            मनोज भोसले यांनी याआधी हातकणंगले तालुक्यात  एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी ,कणकवली तालुक्यात गटविकास अधिकारी व आटपाडी तालुका पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. जावली पंचायत समितीमध्ये मनोज भोसले यांनी याआधी शेती अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. 
       मनोज भोसले जावली पंचायत समितीचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी तात्काळ दरड प्रवण क्षेत्रातील बोडांरवाडी , भुतेघर , वाहिटे गावाला भेट देत डोंगरदर्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली .जावली तालुका हा दुर्गम व डोंगराळ असला तरी विविध शासकीय योजनांमध्ये तालुक्याने चांगले काम केले असून तालुका सर्व योजनांमध्ये आघाडीवर राहण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नूतन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी सांगितले.
To Top