भोर ! आंबाडेचा अनिकेत खोपडे गावातील पहिलाच पोलीस उपनिरीक्षक : परिसरातून कौतुक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत आंबाडे ता.भोर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनिकेत रोहिदास खोपडे या तरुणांने जिद्दीने अभ्यास करून ४०८ गुण मिळवित राज्यात ६५ वा क्रमांक पटकावला असून अनिकेत हा आंबाडे गावातील पहिलाच पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्याने त्याचे वीसगाव खोरे परिसर तसेच तालुक्यातून कौतुक होत आहे.
     अनिकेत याचे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय आंबाडे येथे शिक्षण झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील शिवाजी विद्यालय तसेच अनंतराव थोपटे महाविद्यालयात पूर्ण केले आहे.अनिकेतचे वडील रोहिदास खोपडे हे उत्तम शेतकरी असून त्यांनी शेती तसेच खाजगी बसच्या ड्रायव्हर म्हणून काम करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले.अनिकेतने महाविद्यालयीन शिक्षण करता-करता पोलीस उपनिरीक्षक होण्याची जिद्द मनाशी बाळगली होती.त्यामुळेच तो या पदापर्यंत पोहोचू शकला असे वडील रोहिदास खोपडे यांनी सांगितले.
To Top