सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र मदने यांची तर उपाध्यक्षपदी मनोहर धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या कार्यालयात शनिवारी (दि.८) रोजी झालेल्या संचालकमंडळाच्या बैठकीत या निवडी पार पडल्या. या अगोदरचे अध्यक्ष संदीप कदम यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी प्राचार्य बाळासाहेब मिंड, संचालिका प्रतिभा कुलकर्णी, जानव्ही जगताप, शरद जगदाळे, बाळासाहेब बालगुडे, राजेंद्र झुरुंगे, संग्राम भोसले, दीपक परकाळे, सचिव ए.बी गायकवाड, संजय वाबळे, सोमेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष कल्याण जगताप यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर सोमेश्वरचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मदने यांचे अभिनंदन केले.