भेटला.. विठ्ठल माझा...म्हणत बारामतीच्या तरुणांकडून अजितदादांना विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती भेट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक ४० आमदारांना बरोबर घेत सरकारमध्ये एन्ट्री मारत सर्वांना धक्का दिला. 
           अजितदादांना उपमुख्यमंत्री पद मिळताच बारामती मधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट मुंबई येथील देवगिरी निवासस्थान गाठत पवार यांना उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. बारामती तालुक्यातील अनेक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देवगिरी निवासस्थानी एकच गर्दी केली. त्याच दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड व त्यांचे सहकारी बाळासाहेब शिंदे,सागर गायकवाड, हरिष गायकवाड,नितीन साखरे, सूरज जाधव, सागर गवळी यांनी अजित पवार यांना विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती भेट दिली.
To Top