बारामती ! सोमेश्वरनगरच्या कृष्णाली अभ्यासिकेचे आठ विद्यार्थी पोलिस दलात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील कृष्णाली अभ्यासिकेच्या आठ विद्यार्थ्यांनी पोलिस दलात यश मिळविले आहे. यामध्ये अक्षय तरडे, भूषण भोई, राहुल चव्हाण, विशाल गडदे यांनी मुंबई पोलिस दलात, तर अमोल चिरमे याने पुणे ग्रामीण, विशाल चव्हाण यांनी रायगड पोलिस, आरोही शिळीमकर ठाणे, तर अमृता चौधरी हिने सातारा पोलिस दलात यश मिळविले आहे. कै. बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुलामधील कृष्णाली अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी चांगले वातावरण, फोनवर नोकरभरतीसाठी आवश्यक नोट्स, अनलिमिटेड मोफत वायफाय तसेच गरजू मुलांना फीमध्ये सवलत देण्यात येत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले पोलिस भरती झाल्याने सोमेश्वरनगर परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागात अभ्यासिका तयार होत असल्याने विद्यार्थ्यांना पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन मिळत असल्याने चालू वर्षी या भागातून मोठ्या प्रमाणात मुले पोलिस भरती झाली आहेत.
To Top