सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई शहरात होणारे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सुचना दिलेल्या होत्या त्यानूसार कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाकडे विशेष लक्ष देवून आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे यांना त्याच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाई शहरातील मोटार सायकल चोरुन नेणारे अल्पवयीन मुले आहेत. सदर बातमीच्या अनूशंगाने तपास करुन सदर मुलांचा शोध घेणे बाबत त्यांनी गुन्हे प्रकटीकरणविभागाचे कर्मचा-यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर मुलांचा शोध घेवून गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यामुलांनी त्याचा तिसरा साथीदार आरोपी यांनी मिळून फेब्रुवारी २०२३ पासून वाई शहरातून व आजूबाजूच्या परीसरातून १० मोटार सायकल चोरल्या असून त्या सोमेश्वर, बारामती परिसरात विकल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर आरोपींनी विकलेल्या ४ हिरो स्प्लेन्डर प्रो २ हिरो स्प्लेन्डर प्लस, १ हिरो स्प्लेंडर, १ हिरो एच. एफ. डिलक्स, १ हिरो शाईन, १ यामाहा आरएक्स १०० अशा एकुण सुमारे २,५०,०००/- रुपये किंमतीच्या १० मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या कडून वाई पोलीस स्टेशनला दाखल असलेले ५ गुन्हे उघडकीस आलेले असून इतर मोटार सायकलचे मालकांचा शोध घेवून पुढील कारवाई करण्याच काम चालू आहे. सदरची कारवाई कमलेश मीना, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक, वाई पोलीस ठाणे आशिष कांबळे, सहराय्यक पोलीस निरीक्षक, सुधीर वाळुंज, पोलीस उप निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, राहुल भोईर, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के यांनी सहभाग घेतला