सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील पसरणी घाटात सायंकाळी बसचा ब्रेक फेल होऊन पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे.
बस थोडक्यात कठड्यामुळे बचावली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी कि वाईहुन महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बसचा पसरणी घाटात ब्रेक फेल झाला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस नाल्याच्या दिशेने घसरली. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या दुचाकी चालकास पाठीमागे बस येत असल्याचे समजले नाही. त्यामुळे बस खाली दुचाकी सापडल्याने दुचाकी वरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत वाई पोलिसात झालेली नव्हती. सुदैवाने बस दरीमध्ये जाता जाता बचावली आहे.