सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
कोऱ्हाळे बुद्रुक : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे या मागणीचे निवेदन समतानगर येथील बौद्ध योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला दिले.
संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एका पुस्तकाचा हवाला देत राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या आईविरोधात अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले होते. याचे पडसाद पावसाळी अधिवेशन व राज्यभर उमटले. कोऱ्हाळे बुद्रुक येथील बौद्ध युवक संघटनेच्या तरुणांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात संभाजी भिडे विरोधात तक्रार अर्ज केला आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, हेमंत गडकरी, अक्षय चव्हाण, चैतन्य चव्हाण, भाग्यवान चव्हाण उपस्थित होते