Big Breaking ! जुन्या रागातून चुलत भावाचा खून करून विहिरीत फेकून दिले : इंदापूर तालुक्यातील कळंब येथील घटना

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात कळंब येथे फिर्यादी रेश्मा हनुमंत जाधव राहणार कळंब ता. इंदापूर यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 
       फिर्यादी यांचे पती हनुमंत सर्जेराव जाधव वय ३६ वर्ष हे त्यांची मोटार चालू करण्यासाठी जमीन गट नंबर २३७ मध्ये लाईटच्या खांबावर आकडा टाकण्यासाठी गेले. असताना आरोपी दत्तात्रय हरिदास जाधव राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हनुमंत सर्जेराव जाधव यांच्या हातावर पाठीवर डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी करून विहिरीत ढकलून देऊन जीवे ठार मारून त्यांचा खून केला. याबाबत वालचंद लनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे हे करीत आहेत. 
To Top