बारामतीच्या सुपुत्राकडे तीन जिल्ह्यांची जबाबदारी ! मेंढपाळ कुटुंबातील जगन्नाथ लकडे यांचेकडे लातुर, नांदेडसह धाराशीवचे अतिरिक्त उपसंचालकपद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम ------
सोमेश्वरनगर : गणेश आळंदीकर
"सोन्याला पाण्यात  टाका अगर आगीत  टाका ते त्याचा रंग बदलत नाही "असेच काही लोकांचे  असते. त्याना कोठेही टाका ते त्यांचे कार्यकर्तुत्वाने आपली चमक प्रत्येक क्षेत्रात दाखवतात .अशीच काहीशी परिस्थीती एकेकाळी अनवाणी पायाने पळणा-या धावपटु जगन्नाथ लकडे ने करुन दाखवली आहे .सेना दलात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदके मिळवुन दिली .
      आणि सेनादलानंतर प्रशासकीय सेवेत ही त्याने आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवीत  तालुका क्रिडा अधिकारी ते उपसंचालक पदापर्यंत  मजल मारत राज्यातल्या क्रिडा क्षेत्रात आपले अमुल्य योगदान देत या क्षेत्राला बळकटी आणली आहे .
      काल शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी  राज्याचे क्रिडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र राज्य चे सहसंचालक सुधीर मोरे यांचे सहीने नुकतेच लकडे याना अतिरिक्त उपसंचालक पदाची जबाबदारी चे पत्र देण्यात आले . लातुरचे उपसंचालक सुधीर भाऊराव  मोरे यांची पदोन्नती होवुन राज्याचे सहसंचालक पदी त्यांची निवड झालेने  लातुरचे जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांची अतिरिक्त उपसंचालक पदासाठी निवड करणेत आली .
      बारामती तालुक्यातील करंजेपुलचे  रहिवासी असलेल्या   जगन्नाथ खंडु लकडे यानी अतिशय प्रतिकुल परिस्थीतीतुन सेना दलात ॲथलेटीक मधे  अशियाई स्पर्धातुन भारताला पदके मिळवुन दिली . बारामतीचे नाव उज्वल करण्यात पवार कुटुंबाप्रमाणे ते ही यशस्वी झाल्याने  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सुनेत्राताई पवार  यानी स्वत:च्या मुलाप्रमाणे त्याचेवर प्रेम करुन त्याला सुरुवातीच्या काळात मोठी मदत केली त्यामुळे तो आंतराष्ट्रीय स्तरावर चमकला . सोमेश्वर विद्यालयाचा ,काकडे महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणुन त्याने परिसराचे नावलौकीक करीत तालुका क्रिडा अधिकारी असताना तीन तीन तालुक्याचे क्रिडा विभाग सांभाळत, ग्रामीण भागात ओपन जीम सारख्या बाबीना प्रोत्साहन ,भव्यदिव्य क्रिडा संकुले आदी बाबी वाढवुन तरुण मुले  क्रिडा क्षेत्राकडे कशी वळतील याकडे लक्ष दिले.बारामती तालुका क्रिडा अधिकारी असताना बारामतीत अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली भव्य क्रिडा संकुलासह केलेलेया भरीव कामाची  दखल घेत क्रिडा विभागाने लातुरचे जिल्हा क्रिडा अधिकारी पद त्याना दिले .तेथे आपल्या कामाची चमक दाखवुन मोठे योगदान दिल्याने त्यांचेकडे   आता लातुर ,नांदेड ,धाराशीव (पुर्वीचे उस्मानाबाद )या तीन जिल्ह्याचा कार्यभार  सोपवला आहे .
      दरम्यान युवकाचा क्रिडा क्षेत्रात सहभाग वाढावा व सेना दलात रुची व्हावी म्हणुन सुट्टीला आलेवर पदरखर्चातुन आवर्जुन नवतरुणाना प्रशिक्षण देण्याचा त्यांचा उपक्रम आहे. तसेच आजी माजी सौनिकासाठी त्यानी सोमेश्वरनगर  येथे संघटना स्थापन करुन शेकडो सैनिकांचेही प्रश्न सोडवण्याचे श्रेय लकडे याना  जाते .त्यांच्या उपासंचालक पदाच्या निवडीने उपजिल्हाअधिकारी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख स्वीय सहायक हनुमंत पाटील व बारामतीतील क्रिडा विभागातील अधिकारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे .
      माझ्या यशात बारामतीकरांचे मोठे योगदान.. लकडे 
     मी झोपडीत असताना माझा सराव चालु ठेवला ,सैन्य दलात पदके मिळवली .त्या त्या वेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार ,करंजेपुल चे ग्रामस्थ व एका धडपडणा-या  व्यक्तीमत्वाला प्रकाशात आणणारी विविध वृत्तपत्रे व पत्रकार बंधु यांचे मोठे योगदान असल्याचे जगन्नाथ लकडे यानी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना सांगीतले .
To Top