सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण का महत्वाचे ! पाटबंधारे खात्याने दिले आंदोलकांना स्पष्टीकरण


 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 नीरा : विजय लकडे
निरा डाव्या कालव्याचा अस्तरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला निरा आणि परिसरातून काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. नीरा ग्रामपंचायतीच्या समोर एकत्र येत शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होते.यानंतर आता पाटबंधारे विभागाच्यावतीने या आंदोलकांना शनिवारी नीरा येथील कार्यालयात बोलावून या संदर्भातील एक पत्र देण्यात आले आहे. कालव्याचे अस्तरीकरण का महत्त्वाचा आहे याबाबत या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र आंदोलकांनी हे कारण अमान्य असल्याचे म्हटले असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे 

    पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या नीरा डाव्या कालव्याचे सध्या अस्तरीकरण करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट आणि मध्ये प्लॅस्टिक पेपर टाकून कालव्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मात्र या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अस्तरीकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नीरा येथे नुकतेच याबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलकांना आज दिनांक 12 रोजी पाटबंधारे विभागाकडून एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार नीरा डाव्याचे आयुष्य १४० वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कालव्यामध्ये खेकड्यांनी अनेक ठिकाणी घळ निर्माण केले आहेत. यामुळे अनेक वेळा कालवा फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याचबरोबर कालव्यातील एकूण पाण्या पैकी 50 टक्के पाणी हे गळती होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही गळती थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे मजबुतीकरण करण्यात येत असल्याचे पाठाबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
     यावेळी कालवा  अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक महेश जेधे, नीराचे उपसरपंच राजेश काकडे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ता चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य,संदीप धायगुडे,भाजप युवक तालुका अध्यक्ष सुरेंद्र जेधे, आम आदमी पार्टीचे विजय धायगुडेसामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप व अनेक शेतकरी  उपस्थित होते.

     महेश जेधे ( अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक)
    पाटबंधारे विभागाने कालव्याचे मजबुती कारण जरूर करावे.पण ते मुरूम आणि मातीयाचा वापर करून करावे.याला आमची काही हरकत नाही.पण शासन प्लॅस्टिक पेपर टाकून काँक्रिटच्या साह्याने मजबुती कारण करीत आहे.त्यामुळे कलाव्या शेजारील पाझर पाण्यावर असणारी शेती धोक्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी काँक्रिट करायला आमची हरकत नाही परंतु.सर्वच कालवा काँक्रिट टाकून लोकांना पाण्यासाठी भिक मागायची वेळ सरकार आणणार आसेल तर पुन्हा आंदोलन करावे लागेल.हे पाणी कोण सरकारच नाही तर ते जनतेच आहे.आमचा या पाण्यावर हक्क आहे.सरकारनं जनतेच हित पाहावं व्यापारी बनू नये.नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण का महत्वाचे ! पाटबंधारे खात्याने दिले आंदोलकांना स्पष्टीकरण
पुरंदर ! नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण का महत्वाचे ! पाटबंधारे खात्याने दिले आंदोलकांना स्पष्टीकरण
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiQNcOwXGTDetdaTFIW_tgmygYf_4fddrd-jbK2DuDZ1LcPhV7dOvqUweN-5hPq3dyr4rnbXrGpAO4mI8F-z9nrFMtf1a7nwqzlthcGtLocdiuJfeUQ6XJJE85zreRBDEcW_LEj5XRXmmL_a_CnmOyoB6rnP0WgrAvh7k_B5G1GO0C3v2xqzUTLBvFOaQvd
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiQNcOwXGTDetdaTFIW_tgmygYf_4fddrd-jbK2DuDZ1LcPhV7dOvqUweN-5hPq3dyr4rnbXrGpAO4mI8F-z9nrFMtf1a7nwqzlthcGtLocdiuJfeUQ6XJJE85zreRBDEcW_LEj5XRXmmL_a_CnmOyoB6rnP0WgrAvh7k_B5G1GO0C3v2xqzUTLBvFOaQvd=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_12.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_12.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy