सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
येथील बस स्थणकवर आज दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार् झाली.
श्रावणी विकास आयवळे रा. सुलतानपूर, ता. वाई असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जोशी विद्यालयात ७ वी मध्ये शिकत होती. वाई बालेघर गाडी क्र. एम एच १४ बी टी ०४९६ ही बस बस्थानक फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्त्यांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी श्रावणी आयवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले. यामुळे बसस्थनकावर खळबल उडाली तसेच बघायची गर्दी जमली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले राहणार नांदवळ वय ३६ याला ताब्यात घेतली आहे.
COMMENTS