सोमेश्वर रिपोर्टर टीम---
शिरोळ : प्रतिनिधी
राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेच्या गुणवत्ता वाढीबरोबरच भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी सामुदायिक प्रयत्न करून शाळेची प्रगती करूया असे आवाहन नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांनी केले
येथील राजाराम विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या नूतन पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत आणि मावळत्या सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी जयश्री धर्माधिकारी या बोलत होत्या
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा शितल जगदाळे नूतन सदस्य प्रियांका इंगळे सारिका सकट दत्तात्रय पुजारी रवींद्र पाटील विद्यार्थी प्रतिनिधी बुद्धम मोहिते अनुजा पुजारी व सखी सावित्री पालक समितीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री चव्हाण यांचा सत्कार करून स्वागत केले तर मावळते सदस्य सुरेश गावडे मनीषा जाधव राहुल भोसले यांचा सन्मान करून निरोप देण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्षा शितल जगदाळे सदस्य चंद्रकांत भाट रवींद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केले आभार त्रिशला येळगुडे यांनी मानले.
शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नगरसेविका करुणा कांबळे अच्युत कुलकर्णी धनाजी गावडे मारुती जाधव गजानन सावंत अध्यापिका सुनंदा पाटील मीनाक्षी हेगाण्णा अध्यापक सनी सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
COMMENTS