पुरंदर ! साथीच्या आजारात अशी घ्या डोळ्यांची काळजी : नीरा आरोग्य केंद्राच्या वतीने मार्गदर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------  
निरा : प्रतिनिधी  
राज्यभरात सध्या चालू असलेल्या डोळ्यांच्या साथी विषयी काळजी घेण्याची सूचना प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पिंपरे  येथे देण्यात आल्या.  
निरा नजीक पिंपरे जिल्हा परिषद शाळा येथे आरोग्य सहाय्यक बापू भंडलकर यांनी विद्यार्थ्यांना डोळ्याच्या साथीच्या आजाराविषयी माहिती दिली. यावेळी आरोग्य सेविका योगिता टिळेकर आरोग्य सेवक तुकाराम मुलमुले हे उपस्थित होते.   
यावेळी बापू भंडलकर यांनी आपल्या भागात डोळ्याची साथ पसरू लागली आहे म्हणून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी हाताची व डोळ्याची स्वच्छता यावर विशेष लक्ष देऊन काळजी घेणे गरजेचे आहे असे रुग्ण आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र निरा या ठिकाणी संपर्क साधून मोफत उपचार करून घ्यावेत प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक प्रमाणात डोळ्याचे ड्रॉप उपलब्ध आहेत एका व्यक्तीला दिलेला ड्रॉप दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये असे आवाहन बापू भंडलकर यांनी केले.  
पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार यामध्ये जलजन्य. कीटकजन्य आहे आजार पसरू नये म्हणून घराच्या व शाळेच्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिणे असे आवाहन आरोग्य सेविका योगिता टिळेकर यांनी केले.
To Top