पुरंदर ! नीरा येथे केबल चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : प्रतिनिधी
नीरा ता. पुरंदर  येथे ५७ हजार रुपयांच्या चोरी प्रकरणी नीरा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
         याबाबत सूरज विजय लकडे रा. निंबुत वसाहत ता.बारामती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
         सविस्तर हकीकत अशी, निरा ( ता पुरंदर ) वार्ड नंबर दोन मधील घुले कॉलनी येथील सुरज विजय लकडे यांच्या नवीन चालू असलेल्या इमारतीच्या खिडकीचे दार तोडून आत मध्ये प्रवेश करून कट्टरच्या साह्याने घरातील पहिल्या मजल्यावरील एक हॉल तीन बेडरूम व तीन टॉयलेट बाथरूम मधील अडीच एमएम  दीड एमएम व एक एमएम. आर काबेल फिनोलेक्स कंपनीच्या वायरीगचे ८९ बंडल, अंदाजे किंमत ५७ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची होते. 
सदरचा तपास फिर्यादी व पोलीस हवलदार मदने यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे केला असता गुन्हा घडते वेळी संशयस्पद रित्या फिरताना आढळली  त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  
जेजुरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी बीपी सांडभोर. एपीआय सोनवलकर, सपोनी संदीप मोकाशी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदने पुढील तपास करत आहेत.
To Top