दुर्दैवी ! पाच वर्षाचा रघुनाथ बहिणीबरोबर अंगणात खेळत होता, सर्पदंश झाला : उपचारादरम्यान मृत्यू ! भोर तालुक्यातील खानापूर येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
घराशेजारी अंगणात खेळताना सर्पदंश झाल्याने खानापूर ता.भोर येथील अंगणवाडीत शिकणारा चिमुकला रघुनाथ मारुती भालेराव वय  ५ वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. 
       भोर तालुक्यात पाऊसाच्या विश्रांतीने सध्या वातावरणात उकाडा फार वाढला आहे.परिणामी सर्प गारव्यासाठी घरांशेजारील गवत-वेलींचा आधार घेत आहेत.दरम्यान लपून बसलेले सर्प लहान मुले तसेच नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार तालुक्यात वाढले आहेत. त्यातच रघुनाथ भालेराव हा चिमुकला खानापूर ता.भोर येथील घराशेजारील अंगणात मोठ्या बहिणी बरोबर खेळत होता.यावेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सर्पाने दंश केला. मात्र रघुनाथ हा वयाने लहान व नकळत असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे समजून आले नाही.रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्याने भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले.तात्काळ या चिमुकल्याला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.रघुनाथ भालेराव या चिमुकल्याचा सर्पददंशाने मृत्यू झाल्याने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------
चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे
सध्या वातावरणात उकडा मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्प घराच्या अवतीभवती गारव्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.लहान मुलांना सर्प म्हणजे काय कळत नसल्याने अचानकपणे गवत वेलीमध्ये खेळताना सर्पदंश झाला तर मोठी घटना घडण्याचे शक्यता असल्याने चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे जेष्ठ व्यक्तींकडून सांगण्यात आले.
To Top