पुरंदर ! नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी नीरेत निदर्शने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण कायम स्वरूपी रद्द करण्यात यावे या मागणीसाठी नीरा - शिवतक्रार, पिंपरेखुर्द, जेऊर, मांडकी, गुळूंचे, कर्नलवाडी गावातील शेतक-यांनी बुधवारी ( दि.९) सकाळी दहा वाजता नीरा ग्रामपंचायतीजवळ निदर्शने केली. 
          यावेळी निमंञक महेश जेधे, दत्ताजीराव चव्हाण, नीरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, गुळूंचेचे माजी सरपंच संतोष निगडे, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, ग्रा.पं.सदस्य  संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, उत्तम धुमाळ, दिलीप धुमाळ, सुरेंद्र जेधे, सचिन मोरे, अमोल साबळे, विजय धायगुडे, टी.के.जगताप आदींनी नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध दर्शविला. 
       या प्रसंगी नीरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांना नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण कायम स्वरूपी रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
          नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार संदीप मोकाशी , पोलिस हवालदार घनश्याम चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल संदीप कारंडे, निलेश करे, निलेश जाधव
, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नीरा पाटबंधारे उपविभागात  वीर धरणाच्या झिरो कि.मी.पासून ते २९.६ कि.मी. करंजेपुल पर्यंत नीरा डावा कालव्याचे मजबुतीकरण केल्यानंतर ज्या ठिकाणी भराव ढासळतो.  ज्या ठिकाणी कालव्याच्या पाण्याची वारंवार गळती होते . तसेच कालव्यावर ज्या ठिकाणी पुल, मोरी यांसारखी जुनी बांधकामे आहेत. त्या बांधकामाच्या अलीकडे व पलीकडे अंदाजे ५०,ते २०० मीटर पर्यंत अस्तरीकरण करण्यात येत आहे. संपुर्ण कालव्याचे अस्तरीकरण होत नसल्याची माहिती नीरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता 
 योगेश भंडलकर यांनी दिली.
To Top