सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सुंदर बसस्थानक अभियान २०२३ मधील घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यात मेढा आगाराने प्रथम क्रमांक पटकावून वेगळा ठसा उटवला असून राज्यात फक्त मेढा आगाराचाच डंका वाजताना दिसत आहे.
राज्यात स्वच्छ आणि सुंदर बसस्थानके होण्यासाठी शासनाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सुंदर बसस्थानक अभियान २०२३ राबविण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे प्रत्येक आगार प्रमुखांना सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केल्यानंतर राज्यामधून सर्व विभागातील आगारांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सुंदर बसस्थानक अभियान २०२३ स्पर्धेसाठी अल्प कालावधी मिळाला असताना सुध्दा मेढा आगाराच्या नुतन आगार प्रमुख निता बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसभागातुन आणि स्वनिधितुन स्वच्छतेस सुरुवात केली. रंगरंगोटी , वृक्षारोपन आदी विविध उपक्रम राबवुन परीसर स्वच्छ केला.
मेढा आगार हा ग्रामिण भागातील छोटा आगार असुन जावली तालुक्याच्या दृष्टीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सुंदर बसस्थानक अभियान २०२३ चा ' क ' वर्गातील राज्यात प्रथम पुरस्कार म्हणजे एक ईतिहास आहे. आगार प्रमुख निता बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.