सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
शिरोळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली संघाच्या चेअरमनपदी शिरोळच्या सौ प्रतिभा निनाद भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी कुरुंदवाडचे सुरेश कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे
सन २०२३ ते सन २०२८ या पंचवार्षिक काळासाठी शिरोळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली सहाय्यक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर संघाचे सचिव एन एच पाटील यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली संघाच्या ११ जागेसाठी ही निवडणूक झाली यातील १० जागा बिनविरोध निवडून आल्या तर भटक्या विमुक्त जमाती या गटातून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्यामुळे सदरची १ जागा रिक्त ठेवण्यात आली आहे
संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा झाली या सभेत चेअरमनपदी सौ प्रतिभा निनाद भोसले( शिरोळ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश आनंदा कांबळे (कुरुंदवाड )यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन चेअरमन सौ प्रतिभा भोसले म्हणाल्या की सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी पारदर्शक कारभार केला जाईल सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्व सभासदांना आवश्यक त्या योजनेचा लाभ दिला जाईल तसेच येत्या वर्षभरात संस्थेच्या जागेत स्वंमालकीची इमारत बांधून पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले
शिरोळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिरोळ तालुका भाजप नेते तथा दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव आणि एस टी कामगार नेते निनाद भोसले यांनी पुढाकार घेतला होता निवडणूक लागून अडचणीत असणाऱ्या संस्थेवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी श्री यादव व भोसले यांनी सर्वसमावेशक उमेदवारांची निवड करून संघाची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली दरम्यान चेअरमन व्हॉईस चेअरमन पदाच्या निवडीनंतर नूतन संचालक मंडळाचा सत्कार अनिलराव यादव यांच्या हस्ते त्यांच्या सप्तश्री या निवासस्थानी संपन्न झाला खादी ग्रामोद्योग संघाच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने एकत्रितपणे काम करावे त्यास आपले कायमस्वरूपी सहकार्य राहील असे यादव यांनी सांगितले
नूतन संचालक मंडळ असे
चेअरमन : प्रतिभा निनाद भोसले( शिरोळ) व्हाईस चेअरमन सुरेश आनंदा कांबळे (कुरुंदवाड) संचालक - चंद्रकांत गुंडा जाधव (हरोली) सुधीर बबन आदमाने (यड्राव) श्रीमती निर्मला लिंबाजी चव्हाण( नांदणी) विठ्ठल सीताराम पांडव (चिपरी )सुरेश रघुनाथ गंगधर( शिरोळ) कुमार देवाप्पा भंडारी( तेरवाड )सौ सुशीला आण्णासो बावचे( हेरवाड) गजानन आप्पासो सुतार (मौजे आगर)