भिगवण ! आकाश पिसाळ ! रस्त्याचा कचरा उचलायचा कोणी ? टोल प्रशासनाचे तोंडावर बोट : तर नागरिकांचे नाकावर रुमाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : आकाश पिसाळ
देशभर स्वच्छतेचा जागर सुरु असताना पुणे सोलापूर महामार्ग मात्र कचरा कुंडी होत असूनही हायवे प्रशासन आणि टोल प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचे चित्र कचर्याच्या ढिगाऱ्याकडे पाहिल्यावर दिसून येते.
            भिगवण गावाला दोन भागात विभागणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गाला सुरवाती पासूनच कचर्याच्या समस्येने ग्रासले असून याकडे टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे .त्यामुळे संपूर्ण रोड वर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.तसेच या कचर्याच्या ढिगात आपल्या खावूच्या आशेने त्यावर ताव मारण्यास येणाऱ्या मुक्या जीवांचे अपघात घडत आहेत.तसेच या मुक्या जनावरांमुळे मोठा अपघात होवून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मदनवाडी चौकात असणाऱ्या पुला खाली तर या जागेचा स्वच्छतागृहा सारखाच वापर केला जात असल्यामुळे नाकावर रुमाल लावण्याची वेळ या ठिकाणी उभ्या असणाऱ्या प्रवाश्यांवर येते.याकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे..तर मुख्य रस्ता दोन्ही बाजूने कचर्याने वेढला आहे. याकडे टोल प्रशासनाने तातडीने स्वच्छता करणे गरजेचे आहे.मात्र या बाबत टोल प्रशासन ग्रामपंचायती कडे बोट दाखवीत असून रोडच्या शेजारी असणारे हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.ग्रामपंचायत भिगवण आणि टोल प्रशासन यांच्यात या विषयावर अनेक वेळा चर्चा होवूनही मार्ग न निघाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
मदनवाडी ब्रिज खाली झाडांची रोपे लावून या ठिकाणी गार्डन केले जाणार असल्याचे अनेक वेळा हायवेच्या अधिकारी यांनी सांगून झाले तर याठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही त्यामुळे घाणीचे साम्राज्र वाढीस लागले असून टोल घेण्यात मशगुल असणाऱ्या प्रशासनाला याची कोणतीही फिकीर असल्याचे दिसून येत नाही.
          याबाबत पाटस टोल विभागाचे मेंटेनन्स प्रतिनिधी नेत्रपाल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच या ठिकाणी स्वच्छता करण्यात येनार असल्याचे सांगितले.
To Top