मेढा ! ओंकार साखरे ! हातात हात घेवू ....आणि जावली जोडी रनर्स मध्ये धावू : १ आक्टोंबरला आयोजन, जावलीकरांसाठी पर्वणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - ओंकार साखरे
उत्तम आरोग्य आणि सुंदर स्वास्थ्य  राहण्यासाठी शरीराला व्यायामाची जोड हवी असते. मनूष्य जिवनात निरोगी राहण्यासाठी धडपड असतो आणि हाच धागा धरुन जावली रनर्स स्पोर्टस असोशिएनचे वतीने दि. १ आक्टोंबर रोजी जावली जोडी रनर्सचे आयोजन करण्यात आले असून हातात हात घेवून जावली जोडी रनर्सला धावू  असा संदेश दिला आहे. जावली रनर्स स्पोर्टस असोशिएनचे संस्थापक नवनाथ डिगे, संजय धनावडे, अविनाश कारंजकर यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
            जावली रनर्स स्पोर्टस असोशिएन तर्फे माहीती देताना सांगीतले की, जावली रनर्स स्पोर्टस स्पर्धा ही जावली तालुक्यातील जनतेसाठी पर्वणी ठरनार असून सर्व वयोगटातील पुरुष महिला आणि मुले यांना संधी उपलब्ध होणार आहे. जावली रनर्स स्पोर्टस स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून दि. १ आक्टोंबर रोजी मेढा येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत लहान गटातील मुलांसाठी ४ किलोमिटर अंतर असणार आहे. तसेच इतर सर्वांसाठी १० किमी मिटरचे अंतर असणार आहे.
             जावली रनर्स स्पोर्टस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जोडीला तीस बक्षिसे देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी १५ ते २५ , २५ ते ३५ आणि ३५ ते ५० असा वयोगट असून लहान वयातील मुलांसाठी एक वयोगट आहे. स्पर्धे मध्ये धावणार्‍या प्रत्येक जोडीला नाष्टा, टीशर्ट, औषध उपचार आदी सोयी सुविधा बरोबर २०० रु कॅशबॅक सुध्दा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
             जावली रनर्स स्पोर्टस स्पर्धेचे ४ थे वर्ष असून सहभागी स्पर्धेकांना दोन हजार फी भरावी लागणार असून जावली तालुक्यातील स्पर्धकांना सवलत देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगीतले. जिल्ह्यातुन तसेच जिल्हया बाहेरून असंख्य स्पर्धक सहभागी होणार असून जावली तालुक्यातील जनतेने या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि निरोगी आरोग्यासाठी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन नवनाथ डिगे यांनी केले आहे.
To Top